From The Vice Principal's Desk
संगमेश्वर महाविद्यालयाने सोलापूर जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे स्वावलंबी करून त्यांचे करिअर घडविण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. स्पर्धेच्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी व क्षमतेनुसार विविध क्षेत्रांमध्ये रोजगार व्यवसायाच्या संधी साथी आवश्यक असणार्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर इयत्ता अकरावी शास्त्र, कला व वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना एकाच शिक्षण संकुलात राष्ट्रीय व राज्यस्तरीय सर्व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. "शिक्षण ज्ञान व कौशल्याचे, ध्येय राष्ट्र विकासाचे" या हेतूने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी आम्ही सतत कार्यरत आहोत. महाविद्यालयात पारंपरिक अभ्यासक्रमाद्वारे कौशल्य विकासाचे शिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यानी याचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करावे.
With warm regards,
Mr. P. N. Kunte
Vice Principal